29 August 2007

स्पर्श

तीच्या कडे एकटक पाहत होतो,
दोन पाउले पुढे सरसावलो,
मोहच आवरला नाही तीच्या स्पर्शाचा,
तीच्या थंड स्पर्शाने भानावर आलो,
रंगाने हात भरलेले होते..
छे... अजुन ओलीच होती माझी ती कलाकृती...!

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

18 August 2007

संकोच

संकोच
मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?

अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?

प्रेमाची अनेक नाती आहेत,
गोंधळ होतोय इथेच सारा, मनात तुझ्या कोणते असेल...?

ओठावरती स्मीत तुझ्या,
गुपीत त्याचे काय असेल...?

वाटल बघाव तुला एकदा विचारूण,
भाव तुझ्या मनाचा काय असेल...?

असच बोलतेस माझ्याशी की,
तुझ्याही मनात प्रेम असेल...?

हृदयात प्रेम वसलेले पण,
अंत याचा काय असेल...?

पण...
पुन्हा...मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?

अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

माझ्या या नजरेची भाषा तुला कळेना..!

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,

तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

मनातले शब्द मनातच राहून गेले...!!!

मनातले शब्द मनातच राहून गेले...
तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे,
पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,
पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,
पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे,
पण अचनक तिने "हा मझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,
पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

01 August 2007

मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला

मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

खूप सोप असत इथे हातात हात घालून रानोमाल भटकायला,
तर कधी नीजून तीच्या मांडीवर पुनवेचा चंद्र बघायला,

शब्दही सापडतात अलगद इथे तीची स्तुती करायला,
संधीही नाही मीळत तीला मग खोटे खोटे ही रुसयला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,

नाही लागत परवानगी कुणाची सीनेमा बघायला,
खूप मजा येते यार इथे बाइक वर फीरायला,

ती चाही असतो होकार नेहमी माझ्या मीठीत यायला,
कशाचीच उपमा नाही दोस्तांनो तीच्या कुशीत नीजायला,

म्हणूनच मला आवडत स्वप्नांच्या दूनीयेत रमायला,
जे नाही करू शकत खर्या आयुष्यात ते जगायला,


...पण काय सांगू मीत्रानो तीचाच एस एम एस येतो शेवटी,
मला स्वप्नातून जागे करायला...!

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

एकांत

एकांत तुला नि मला भेटवणारा,
भेटल्यावर हवाहवासा वाटणारा,
कधीकधी हसवणारा कधीकधी रडवणारा,
सुख दुखात नेहमी साथ देणारा,
मनातील भाव नकळतच जाणणारा,
वेदना विसरायला लावणारा ,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......

न बोलता सर्व काही सांगणारा,
न सांगता सर्व काही समजावणारा,
जिवनातील कमतरता दाखवणारा,
आठवणी अनाहुतपणे जागवणारा,
त्या आठवणींच्या हिंदोळ्यांवर खेळवणारा,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......


कधी प्रेम तर कधी द्वेष दाखवणारा,
कधी प्रेम तर कधी द्वेष दाखवणारा,
असाच हा एकांत तुला नी मला भावणारा,
अंधारलेल्या रात्री तारे मोजायला लावणारा,
रात्ररात्रभर तुझा विचार करायला लावणारा,
चंद्राच्या साक्षीने सर्व विसरायला लावणारा,
असाच हा एकांत स्वतःबद्दल काही सांगणारा,
एकांत हा तुला नि मला आवडणारा.......

˙·•●♥PR@D!P♥●•·˙