02 October 2007

तुझ्या स्पर्शाचा आनंद..!

तुझ्या कोमल स्पर्शाचा

आनंद अनुभवतांना
कधीच वाटले नव्हते,
तो स्पर्श, तो आनंद
असेल क्षणाचा,
पण...

आज असे वाटते की,
ते क्षणच
लपून बसले असावेत,
गर्द काळ्या भूतकाळात
तरीही...

ते क्षण अमर झाले आहेत,
माझ्या हृदय मंदीरत
आणी...

मी आजही अनुभवतोय
तोच स्पर्श तोच आनंद
अगदी तू नसतांनाही...

feeling of your touch...

तुझ्या प्रेमाची जादू..!

तुझ्या नीखळ सौंदर्याकडे बघून

सुंदरताही लाजलीय,
तुझे हास्य एकूण
खुद्द हास्यही हीरमुसलय,

त्या खळखळनार्या नीरझराने
तुझीच प्रेरणा घेतलीय,
वेणूंच्या सप्त सुरांनीही
तुलाच साद घातलीय,

तुला बघीतल्यापासून
माझे शब्दच हरवलेत,
पण माझ्या हृदयाचे गीत
माझे ओठ गुणगूनत आहेत.

तुझ्या प्रेमाने माझ्यावर
एक वेगळीच जादू केलीय,
देवाकडे काय मागू तुला
तो स्वतः माझ्याकडे तुला मागायला आलाय...
I think it's a magic of ur Love..

15 September 2007

प्रेमात तर दोघेही आहोत

प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?

बोलायचे तर दोघंानाही आहे,
पण शब्द कोण देणार..?

भेटायचे तर दोघंानाही आहे,
पण वेळ कोण देणार..?

प्रेम तर व्यक्त करायचय दोघंानाही,
पण पहल कोण घेणार..?

स्पर्श तर दोघंानाही हवा आहे,
पण हींमत कोण देणार..?

तोडायचेत पाश बंधनाचे,
पण साथ कोण देणार..?

सोबत तर हवी आहे जन्माची,
पण हात कोण देणार..?

प्रेमात तर दोघेही आहोत,
पण इशारा कोण देणार..?

01 September 2007

जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...!!!

जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...!!!

अश्रूंचे झाले असते मोती,
काट्यान्ची झाली असती फुले,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या हृदयाची राणी झाली असती...

सुरानाही मीळाले असते नवे संगीत,
तीच्या नी माझ्या हृदयाची तार छेडली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वरांची रागीणी झाली असती...

डोळ्यांतून हृदयात उतरली असती प्रेमाची नशा,
जगन्यालाही मीळाली असती एक नवी दीशा,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वप्नातली परी झाली असती...

प्रेमाची केली असती नवी काव्ये,
आकाशाचा कागद नी सागराची शाई केली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या आयुष्याची कादंबरी झाली असती...

नको होते मग काहीही मला आयुष्याकडून,
जर तू माझी झाली असती...
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती.....!!!

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

29 August 2007

स्पर्श

तीच्या कडे एकटक पाहत होतो,
दोन पाउले पुढे सरसावलो,
मोहच आवरला नाही तीच्या स्पर्शाचा,
तीच्या थंड स्पर्शाने भानावर आलो,
रंगाने हात भरलेले होते..
छे... अजुन ओलीच होती माझी ती कलाकृती...!

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

18 August 2007

संकोच

संकोच
मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?

अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?

प्रेमाची अनेक नाती आहेत,
गोंधळ होतोय इथेच सारा, मनात तुझ्या कोणते असेल...?

ओठावरती स्मीत तुझ्या,
गुपीत त्याचे काय असेल...?

वाटल बघाव तुला एकदा विचारूण,
भाव तुझ्या मनाचा काय असेल...?

असच बोलतेस माझ्याशी की,
तुझ्याही मनात प्रेम असेल...?

हृदयात प्रेम वसलेले पण,
अंत याचा काय असेल...?

पण...
पुन्हा...मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?

अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?

˙·•●♥PR@D!P♥●•·˙

माझ्या या नजरेची भाषा तुला कळेना..!

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे,

तू आहेस माझी स्वप्न परी,
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी,
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी,
मी मात्र तसाच राहील वार्यावरी,

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी,
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी,
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी,

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना,
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना,
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे,
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

˙·•●♥PR@D!P♥●•·˙