संकोच
मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?
अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?
प्रेमाची अनेक नाती आहेत,
गोंधळ होतोय इथेच सारा, मनात तुझ्या कोणते असेल...?
ओठावरती स्मीत तुझ्या,
गुपीत त्याचे काय असेल...?
वाटल बघाव तुला एकदा विचारूण,
भाव तुझ्या मनाचा काय असेल...?
असच बोलतेस माझ्याशी की,
तुझ्याही मनात प्रेम असेल...?
हृदयात प्रेम वसलेले पण,
अंत याचा काय असेल...?
पण...
पुन्हा...मनात संकोच येतोय एकच,
उत्तर तुझे काय असेल...?
अथांग प्रेम नयनी तुझ्या पण,
अर्थ त्याचा काय असेल...?
˙·•●♥PR@D!P♥●•·˙
18 August 2007
संकोच
Posted by
Pilu
at
11:06 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
लयी भारी ...! एकदम दिलखुलास आहे!
मधे कोणीतरी 'शेवटी आपल्यावर गेम आहे' नावाची कवीता पाठवलेली ... त्यामधेही रुख रुख होती पण त्याला जरा विनोदाची झालर लावलेली! ही कवीता एकदम भन्नाट आहे ...! अगदी जसे होते तसे types ... ;-)
असो ... पण जिला आठवून लिहीली तिच्या मनात काय आले?
Post a Comment